राजकीय

राहुल गांधी शंभर टक्के पप्पू माणूस

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. राहुल यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद अद्याप उमटताना दिसत आहेत. विरोधकांकडून राहुल गांधींवर टीका केली जात आहे.
  • या प्रकरणी भाजप, शिंदे गट आणि मनसे आक्रमक झाली असून यातच आणखी एका नेत्याने राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. भाजप आमदार योगेश सागर यांनी राहुल गांधीवर ‘पप्पू’ म्हणत टीका केली आहे. राहुल यांना देशाचा इतिहास अजिबात माहिती नाही. त्यांचा स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास कमी आहे. राहुल हे 100 टक्के पप्पू माणूस आहे. राहुल हे सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर जास्त लक्ष देण्याची गरज नाही. त्यांना देश माफ करणार नाही, असे सागर म्हणाले.

Related Articles

Back to top button