खेळ

एकच वादा सूर्या दादा… विक्रमी शतकासह भारताचा न्यूझीलंडवर मोठा विजय

टी ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर सध्या भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत तीन t 20 सामने खेळणार आहे. यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर रविवारी दुसऱ्या सामना खेळला गेला. टॉस जिंकून न्युझीलंडने भारताला प्रथम फलंदाजी दिली. टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा सूर्या आजही चमकला.

सूर्यकुमार यादवने या सामन्यात शतक झळकावले. अगदी पहिल्या चेंडूपासून त्याने आक्रमक पवित्रा घेतला.
त्याने मैदानात चौकार, षटकारांची आता आतिशबाजी केली. सूर्याने केवळ 49 चेंडूंमध्ये 111 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे भारताने वीस षटकात 191 धावा काढल्या. सूर्याने आपल्या शतकी खेळीत 11 चौकार तर सात षटकार ठोकले. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अक्षरशः झोडपून काढले.

सूर्याने तंत्रशुद्ध फलंदाजीचे समीकरण बदलून टाकले आहे. सूर्या सध्या भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. 192 धावांचे आव्हान न्यूझीलंडला पेलले नाही. भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. अखेर या सामन्यात भारताने 65 धावांनी हा विजय मिळवला. या सामन्यात त्यांच्या टीम साऊथीने हॅट्रिक साधली होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. 

Related Articles

Back to top button