सोलापूर

सिद्धेश्वर कारखाना बचाव ; सोलापुरात विराट नव्हे अतिविराट महामोर्चा

कुमठे येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बचावासाठी सोलापूरकर एकवटले आहेत. इतकेच नव्हे तर सिद्धेश्वर कारखाना बचाव  मोहिमेला सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यातच सोमवार 19 डिसेंबर रोजी सकाळी या कारखान्याच्या कार्य स्थळापासून विराट महामोर्चा काढण्यात आला. 
यामध्ये विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते, शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा सिद्धेश्वर कारखाना ते होम मैदानापर्यंत काढण्यात आला.  या कारखान्याच्या चिमणीमुळे विमान सेवेला अडथळा येत नाही, असे वारंवार स्पष्ट झाले आहे.
तरी देखील विरोधकांकडून  कारखान्याच्या चिमणीला विरोध केला जात आहे. त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठीच हा महामोर्चा काढण्यात आला. बोरामणी येथील विमानसेवा सुरू करावी, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी पारदर्शीपणे कारभार करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान आजचा मोर्चा अतिविराट होता.

Related Articles

Back to top button