मनोरंजन

… म्हणून अभिनेत्रीने घेतला आई न होण्याचा निर्णय

अभिनेत्री आयशा जुल्का रसिकांमध्ये प्रसिद्ध आहे. तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत.  विशेषता 90 च्या दशकात ती लोकप्रिय ठरली होती. तिने सलमान खानपासून अक्षय कुमार सोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यशाच्या शिखरावर असताना तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न करण्याचा तिचा मुळीच विचार नव्हता. मात्र योगायोगाने हा योग जुळून आला.

2003 मध्ये बिझनेस मॅन समीर वाशी याच्याबरोबर तिचे लग्न झाले. त्यांच्या लग्नाला 19 वर्षे उलटली. मात्र अजूनही त्यांना मूलबाळ नाही. याचा खुलासा स्वतः आयशा जुल्काने अलीकडेच केला आहे. मी माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळे आयुष्यात कधीही आई न होण्याचा निर्णय पूर्ण विचार करून घेतला.
याबाबत पती समीरशी चर्चा केली. समीरने या निर्णयाला होकार दिला, असे ती म्हणाली. मात्र उल्लेखनीय म्हणजे लग्न झाल्यानंतर आयशा जुल्काने गुजरात मधील दोन गावे दत्तक घेतली आहेत. त्या गावातील सुमारे 160 मुलांच्या खाण्याचा व शिक्षणाचा खर्च आयशा जुल्का करत आहे.
तिचे हे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मूल न होण्याचा निर्णय आम्ही स्वतःच्या मर्जीने घेतला असून त्यात आम्ही आनंदी असल्याचे आयशाने स्पष्ट केले. लग्नानंतर आयशाने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकले होते. मात्र 2022 मध्ये तिने कमबॅक केला आहे. सध्या ती ओटीटीमध्ये व्यस्त असते. 

Related Articles

Back to top button