देव चांगल्या माणसांनाच का नेतो?

Admin
1 Min Read

आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या केवळ 38 व्या वर्षी कॅन्सरशी लढा देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील प्रिया मराठे हिच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. प्राजक्ता म्हणाली, आम्ही दोघींनी ‘एकापेक्षा एक’ अशा अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र काम केले. प्रिया एक अत्यंत गुणी, शांत, नम्र आणि सोज्वळ मुलगी होती. ती फक्त स्वतःच्या कामाशी काम ठेवायची.

प्रियाने कधीच कोणाला त्रास दिला नाही. तिचे तिच्या कामावर नितांत प्रेम होते. कोणी काहीही बोलले तरी तिने कधीच उलट उत्तर दिले नाही. देव अशी चांगली माणसंच का नेतो?… असा प्रश्न देखील प्राजक्ताने उपस्थित केला आहे. 

Share This Article