तेजाब, रंगीला, परिंदा, दिलवालेमधून प्रेक्षकांना भुरळ घालणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार हरपले

Admin
1 Min Read

हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका करणारे अभिनेते अच्युत पोतदार यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.

काल रात्री मुंबईतील ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

80 च्या दशकात त्यांनी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि लवकरच त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आणि अभिनय क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव ते बनले. पोतदार हे आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटात प्राध्यापकाच्या भूमिकेत दिसले आहेत. त्यांनी अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त पोतदार यांनी ‘वागले की दुनिया’, ‘माझा होशील ना’ या यांसारख्या टीव्ही शोमध्येही काम केले.

या चित्रपटांमध्ये केले काम- आक्रोश, अर्ध सत्य, तेजाब, परिंदा, दिलवाले, ये दिलगी, रंगीला, व्हाय अल्बर्ट पिंटो को गुस्सा आता है, राजू बन गया जेंटलमन.

Share This Article