अजितदादांकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम!

Admin
1 Min Read
  • विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जबरदस्त यश मिळाले. राज्यात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार पुनरागमन केले. 
  • दरम्यान राज्यात आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. प्रतिभा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्यापदाचा राजीनामा दिला होता, त्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती, अखेर त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश केला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. जळगावमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला, या मेळाव्यात त्यांनी अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला.
  • गेल्या 35- 40 वर्षांत आम्ही अनेक चढउतार पाहिले, सत्ता असताना प्रश्न सुटतात. सत्ता नसताना काय अडचणी येतात हे अनुभवले, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी हा पक्ष प्रवेश झाल्यामुळे जळगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे.
Share This Article