- ‘पवित्र रिश्ता’, ‘साथ निभाना साथियाँ’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ यांसारख्या हिंदी आणि मराठी मालिकांमधून आपल्या दमदार अभिनय कौशल्याची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया प्रिया मराठे यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या केवळ 38 व्या वर्षी कॅन्सरशी लढा देत त्यांनी अखेरची श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रिया गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. मात्र, या आजाराशी लढताना त्यांनी कधीही हार मानली नाही. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.
- गेल्या वर्षभरापासून प्रिया लाइमलाइटपासून दूरच होती. सोशल मीडियावरही ती सक्रिय नव्हती. अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. प्रिया शेवटची ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. परंतु ही मालिकासुद्धा तिने मधेच सोडली होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यात तिने आरोग्याचे कारण दिले होते.
- प्रिया हिचा पती शंतनु मोघे याने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. मराठी अभिनय क्षेत्रातील एक सुंदर जोडपं म्हणूनही यांच्याकडे पाहिले जात होते.
मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन
