सुपरस्टार विजयची सहा तास उशिरा एन्ट्री

Admin
2 Min Read
  • सुपरस्टार अभिनेता आणि राजकारणी विजय यांच्या पक्षाकडून तमिळनाडूतील करुर येथे काल एक सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या सभेत अचानक चेंगराचेंगरी झाल्याने आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे सभेत चेंगराचेंगरी का झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती सध्या समोर आलेली नाही. मात्र या सभेत सुपरस्टार अभिनेता विजय नियोजित वेळेपेक्षा सहा तास उशिरा आल्याने सभेच्या ठिकाणी गर्दी वाढली आणि सभेच्या ठिकाणी अनेक जण बराच वेळ कडक उन्हात उभे राहिल्याने काही लोक बेशुद्ध पडले. ज्यामुळे सभेत चेंगराचेंगरी झाली, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
  • या प्रकरणात तमिळनाडूचे कार्यवाहक डीजीपी जी. वेंकटरमण यांनी सांगितले की, रॅली आणि सभेसाठी दुपारी तीन ते रात्री दहापर्यंत परवानगी देण्यात आली होती. मात्र या सभेसाठी सकाळी 11 वाजेपासून गर्दी जमू लागली. तसेच विजय सभेच्या ठिकाणी 7.40 ला पोहचले. पुरेसे अन्न किंवा पाण्याशिवाय अनेक जण तासन्तास वाट पाहत होते. आम्ही पोलिसांच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यापूर्वी टीव्हीकेच्या रॅलींमध्ये कमी गर्दी होती. परंतु यावेळी गर्दी अपेक्षेपेक्षा खूपच जास्त होती.
  • आयोजकांनी करूरमध्ये मोठ्या मैदानाची विनंती केली होती आणि सुमारे दहा हजार लोकांची अपेक्षा होती. परंतु सुमारे 27 हजार लोक जमले होते. विजय ज्या प्रचारस्थळी जनतेला संबोधित करणार होते. त्या ठिकाणी 500 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते, अशी देखील माहिती त्यांनी दिली.
Share This Article