महाराष्ट्र

ब्रेकिंग! …तर लाडक्या बहिणी लाटणे घेऊनच मागे लागतील

अंमलात आणली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातत. याच योजनेवरून विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. ही योजना निवडणुकीपुरती असून निवडणुकीनंतर ही योजना महायुती सरकार बंद करेल, असे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. 

भुजबळ यांची आज येवल्यात सभा झाली. या सभेत बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, महायुती सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले. महिलांसाठी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतले. वडिलांच्या नावासाोबत आईचे नाव लावावे, हा निर्णय देखील महायुतीचा आहे, असे भुजबळ म्हणाले.

हिंदु धर्मात विद्येची देवता सरस्वती आहे. पण मुलींना शिकवले जात नाही. शौर्याची देवता आई भवानी आहे, पण महिलांना बाहेर पडू दिले जात नाही. संपत्तीची देवता लक्ष्मी देवी आहे, पण घरातल्या लक्ष्मीच्या हातात साधे दहा रुपये देखील दिले जात नाही. मात्र, महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. महिलांना दहमहा पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला. आजवर दोन कोटी 70 लाख भगिंनींना पैसे दिले. 

मात्र, आमचे विरोधक म्हणतात, महायुती सरकार सत्तेवर आले तर योजना बंद करणार. ही योजना केवळ निवडणुकीपुरती आहे. खरंतर ही योजना निवडणुकीपुरती नाही. आम्ही निवडून आल्यावर ही योजना बंद केली तर दोन कोटी महिला लाटणे हातात घेऊन बाहेर पडल्या तर आमचा एकतरी माणूस बाहेर पडेल का, असा सवाल भुजबळांनी केला.

Related Articles

Back to top button