सोलापूर

सोलापूर! शोभा बनशेट्टी यांची भाजपमधून हकालपट्टी

  • राज्यात निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. बंडखोरांनी दोन्ही आघाड्यांची डोकेदुखी वाढवली आहे. अनेक जण निवडणूक रिंगणात असून त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही. दरम्यान, भाजपने पक्षातील बंडखोरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. तब्बल ४० बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या ४० जणांमध्ये अनेक बड्या नेत्यांचा देखील समावेश आहे.
  • भाजपने केलेल्या या कारवाईमुळे निवडणूक निकालांवर परिमाण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातील काही बंडखोर हे निवडून देखील येऊ शकतात. यामुळे मत विभागली जाऊन याचा फटका पक्षाच्या उमेदवाराला बसू शकतो.
  • कारवाई करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये सोलापूर शहर उत्तरमधील शोभा बनशेट्टी, श्रीगोंदा येथील सुवर्णा पाचपुते, अक्कलकोट येथील सुनील बंडगर, तर अमरावती येथील जगदीश गुप्ता यांचा समावेश आहे. बडनेरा येथील तुषार भारतीय व नालासोपारा येथील हरिश भगत यांना देखील पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button