सोलापूर

अकलूजमध्ये काशी जगद्गुरूंची मिरवणुक 

  • मार्ग हा मुक्तीचा” ग्रंथदिंडी कार्यक्रम
  • अकलूज- जेष्ठ अधिक मासनिमित्त अकलूज येथे श्रीमद् ज्ञानसिंहासनाधिश्वर श्री.श्री.श्री.1008 काशी पिठाचे जेष्ठ जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या दिव्यसानिध्यात श्री.ष.ब्र.108 राजगुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज (शिखर-शिंगणापूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि श्री.ष.ब्र.108 सदाशिव शिवाचार्य महाराज (वेळापूरकर) यांच्या नेतृत्वामध्ये जेष्ठ अधिक मासानिमित्त भव्य मिरवणुक, “मार्ग हा मुक्तीचा” ग्रंथदिंडी, आशिर्वचन व धर्मजागृती यात्रा कार्यक्रम संपन्न झाला…   
  • काशी जगद्गुरू व उपस्थित शिवाचार्य यांची तसेच “मार्ग हा मुक्तीचा” ग्रंथदिंडी भव्य मिरवणुक गांधी चौक ते महादेव मंदिर बसवेश्वर चौक या मार्गावरून काढण्यात आली. महादेव देवालय बसवेश्वर चौक येथे जगद्गुरू व शिवाचार्य यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर जगद्गुरू, शिवाचार्य व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
  • श्री.श्री.श्री.1008 काशी पिठाचे जेष्ठ जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांची पाद्यपूजा सौ.हेमलता व श्री.प्रकाश सिद्राम डिकोळे या मानकरी दांपत्याच्या हस्ते संपन्न झाली. नंतर वीरशैव लिंगायत समाज यांच्यावतीने काशी जगद्गुरू व उपस्थित शिवाचार्य यांचा सन्मान वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. श्री.ष.ब्र.108 सदाशिव शिवाचार्य महाराज यांनी अधिक मासानिमित्त आयोजित ग्रंथदिंडी व धर्मयात्रा या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर काशी जगद्गुरू यांनी उपस्थित सर्व सद्मक्तांना “मार्ग हा मुक्तीचा” या ग्रंथाचे महत्व तसेच अधिक मासानिमित्त व हिंदू वीरशैव लिंगायत संस्कृती याबद्दल आशिर्वचन दिले.
  • जगद्गुरूंचे आशिर्वचन झाल्यानंतर उपस्थित महिलांनी जगद्गुरू व शिवाचार्य यांना धोंडेदान करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी अकलूज वीरशैव लिंगायत समाज्यातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, बंधु-भगिनी व परिसरातील सद्गभक्त बहुसंख्येने उपस्थित होते. वीरशैव लिंगायत समाज यांच्यावतीने उपस्थितांना महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

Related Articles

Back to top button