हवामान

Monsoon Update: महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर

यंदा देशासह राज्यात मान्सूनचे आगमन उशिराने झाले आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. दरम्यान येत्या 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यात मान्सूनचा पाऊस लांबणीवर पडला असून पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. ईशान्येकडील भागांसह पश्चिम बंगालमधील काही भागात मोसमी पावसाने वाटचाल केली आहे.
दोन दिवसांपासून राज्यात मान्सूनच्या पावसाची उत्तर सीमा सोलापूर आणि कोकणातील हर्णे येथे स्थिर असून मान्सूनचा पाऊस एकाच जागी रेंगाळल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात मान्सून लांबणीवर पडल्याचे सांगितले जात आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Related Articles

Back to top button