हवामान

पावसाच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम

केरळनंतर महाराष्ट्रातही मान्सूनच्या आगमनाचे संकेत

गेल्या काही दिवसांपासून सोलापूरसह राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट अनुभवायला मिळत होती. मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीलाही अनेक शहरांमध्ये तापमानाने चाळिशी ओलांडल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. मात्र आता या उष्णतेपासून दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रातही मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व सरी कोसळू लागल्या आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याची वाटचाल वेगाने होत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात प्रवेश होण्याचा अंदाज आहे. वातावरणातील बदल, वाढलेली आर्द्रता आणि राज्यभरात सुरू झालेल्या मान्सूनपूर्व सरी यामुळे मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे.

Related Articles

Back to top button