राजकीय
ब्रेकिंग! उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर
- राज्यात निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. बंडखोरांनी दोन्ही आघाड्यांची डोकेदुखी वाढवली आहे. अनेक जण निवडणूक रिंगणात असून त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही. दरम्यान, ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी पाच नेत्यांना निलंबित केले आहे. यामध्ये माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगूल, संजय आवारी आणि प्रसाद ठाकरे यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
- ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापुरात निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली.
- भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि या मतदारसंघात बंडखोरी केली. आघाडीचा धर्म पाळला नाही. शिवाय पक्ष विरोधी वक्तव्य केल्याने ही हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. भाजपला मदत करणारे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला.