राजकीय
बिग ब्रेकिंग! खटाखट तीन हजार रुपये देणार
- राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून सत्ताधाऱ्यांनंतर आता विरोधकांकडून जनतेला गॅरंटी दिली जात आहे. भाजपनंतर आता काँग्रेसनेही पाच गोष्टींची गॅरंटी देण्यात आली. राज्यातील महिलांना महालक्ष्मी योजनेंतर्गत दरमहा तीन हजार रुपये तर महिला आणि मुलींना मोफत बस प्रवास देण्यात येणार असल्याची घोषणा आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. महाराष्ट्र काबिज करण्यासाठी राहुल गांधी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून मुंबईतील आयोजित सभेत ते बोलत होते.
- पाच गोष्टींची काँग्रेसकडून घोषणा :
- महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3 हजार रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.
- शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन.
- जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.
- 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे.
- बेरोजगार तरुणांना दर महिन्याला चार हजार रुपयांपर्यंत मदत.