ब्रेकिंग! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट : राहुल गांधी
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीची प्रचार मोहीम आजपासून सुरू झाली. मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त सभा झाली. या सभेसाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या सभेत महाविकास आघाडीने गॅरंटी जाहीर केले.
महालक्ष्मी योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास, अशी घोषणा करण्यात आली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच सरकार आल्यावर बेरोजगार तरुणांना दर महिन्याला चार हजार रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याची गॅरंटी दिली.
ठाकरे म्हणाले की, आपण जे करतो ते खुलेआम करतो. काळोखात काही करत नाही. आम्ही दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. जे बोलतो तेच करतो. जे बोलत नाही ते करत नाही.