राजकीय

ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

सध्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडू लागला आहे. स्टार प्रचारक आणि नेत्यांच्या सभांनी राजकारण तापू लागले आहे. तर दुसरीकडे फोडाफोडीचे राजकारणही जोरात सुरू आहे. नेत्यांचे इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. अशातच आता उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि लोकसभा निवडणुकीतील ठाकरे गटाकडून उमेदवारी केलेल्या भारती कामडी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी कामडी यांनी शिंदे गटात प्रवेश केला.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने कामडी यांना पालघरमधून तिकीट दिले होते. त्यांच्या विरोधात भाजपचे हेमंत विष्णू सावरा होते. या निवडणुकीत कामडी यांना पराभव स्वीकारावा लागला होता. कामडी यांना चार लाख मते मिळाली होती. यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी देखील त्या इच्छुक होत्या.आता मात्र त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेत फूट पडली, तेव्हा कामडी यांनी उद्धव ठाकरे यांना साथ दिली होती. त्याचेच फळ म्हणून ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत त्यांनी चांगली लढत दिली. मात्र भाजपच्या सावरा यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. निवडणूक अगदी जवळ आलेली असताना घडत असलेल्या या घडामोडी ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरणाऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button