क्राईम

पाच लाख द्या, ईव्हीएम हॅक करून जिंकून देतो, अन्यथा…

  • सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. यातच नाशिक जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. खंडणी मागणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ईव्हीएम मशीन हॅक करून तुम्हाला विजयी करून देतो. त्यासाठी ४२ लाख रुपये लागतील. पैसे दिले नाहीत तर मशीन सेट करणारे माझ्या ओळखीचे आहेत. त्यांना सांगून तुमचा पराभव निश्चित असेल, असे सांगून एका जणाने उमेदवाराकडे पाच लाख रुपये खंडणी मागितली. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
  • याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास मुंबई नाका येथील ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या कार्यालयात एक युवक आला. कार्यालयात उपस्थित असलेल्या एका जणाला तो म्हणाला, मी तुम्हाला ईव्हीएम मशीन हॅक करून दहा पैकी तीन ते चार मते तुम्हाला मिळवू देतो. यासाठी तुम्ही मला ४२ लाख रुपये द्या. त्यापैकी पाच लाख रुपये आता द्यावे लागतील, अशी मागणी त्याने केली. कार्यालयातील पदाधिकाऱ्यांनी यास नकार दिला. पैसे दिले नाही तर ईव्हीएम प्रोग्रामिंग करणारे माझ्या ओळखीचे आहेत. मशीन हॅक करून तुमच्या उमेदवाराचा पराभव करील, अशी धमकी त्याने दिली. 
  • आपला पत्ता सांगून तो निघून गेला. कार्यालयातील लोकांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना देत फिर्याद दाखल केली. यानंतर तपास करत पोलिसांनी भगवानसिंग चव्हाण (मूळ रा. राजस्थान) याला ताब्यात घेतले. आता पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. 

Related Articles

Back to top button