देश - विदेश

ब्रेकिंग! कलम 370 च्या मुद्यावरुन जम्मू-काश्मीर विधानसभेत राडा

  • कलम 370 च्या मुद्यावरुन आज जम्मू-काश्मीर विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. अपक्ष आमदार शेख खुर्शीद हे कलम 370 पुन्हा लागू करण्याची मागणी करणारा फलक घेऊन विधानसभेत आले. त्यावेळी भाजप आमदारांनी विरोध केला. हे प्रकरण इतके वाढले की, त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.
  • अभियंता रशीद यांचे भाऊ आणि अवामी इत्तेहाद पक्षाचे आमदार खुर्शीद अहमद यांनी सभागृहात बॅनर लावायला सुरुवात केली. कलम 370 विरोधात त्यांनी हे बॅनर फडकावले. ज्याला भाजप आमदारांनी विरोध केला. हे प्रकरण इतके वाढले की, त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब केले. त्यानंतर जो कोणी वेलमध्ये येईल, त्याला सभागृहाबाहेर काढून द्या, असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले. त्यानंतर गोंधळ घालणाऱ्या काही विरोधी आमदारांना मार्शलने बाहेरचा रस्ता दाखवला.
  • आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 बाबत दाखवलेल्या बॅनरला विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी विरोध केला. बॅनर पाहून भाजप आमदारही संतापले. त्यावेळी भाजप आमदार आणि कुर्शीद अहमद यांच्यात बाचाबाची झाली आणि सभागृहात गदारोळ झाला. हा गदारोळ इतका गंभीर होता की विधानसभेचे कामकाज आधी 20 मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. 

Related Articles

Back to top button