ब्रेकिंग! वंचित बहुजन आघाडीची जोरदार प्लॅनिंग
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
नऊ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता विजापूर रस्त्यावरील नेहरूनगर येथील मराठा समाजसेवा मंडळ संचलित चंद्राम गुरुजी शिक्षण संकुल डी.एड. कॉलेजच्या प्रागणांमध्ये ही सभा होणार आहे. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील उमेदवाराच्या प्रचारार्थ ही सभा होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे यांनी दिली.
सध्या विविध मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठका, सभा, पदयात्रा, गावभेट दौरा आदींचे आयोजन केले जात आहे. वंचित आघाडीच्या प्रचाराला मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे. राज्य सरकारने खोटी आश्वासने देऊन मतदारांची दिशाभूल केली जात आहे. सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते एकमेकांमध्ये भांडत आहेत. राज्यात स्थिर सरकार येण्यासाठी वंचित आघाडीशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले. शनिवारी होणार्या सभेस कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अक्कलकोट शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, जिल्हा महासचिव अनिरूद्ध वाघमारे, विनोद इंगळे यांनी केले आहे.