ब्रेकिंग! राज्यात नवा ट्विस्ट

Admin
1 Min Read
  • राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप केला जात आहेत. 
  • पोलिसांच्या गाड्यांमधून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना अर्थसहाय्य पुरवल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. पवारांच्या या आरोपानंतर आता पोलिस विभागाच्याही गाड्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. 
  • आमच्या तपासणी संदर्भात ज्या टीम आहेत, त्यांना सर्व प्रकारची वाहने तपासण्याच्या सूचना असतात. संविधानिक पदावरील व्यक्ती असेल त्यांना निवडणूक आयोगाने नियमावली ठरवून दिली आहे. राज्यातील ज्येष्ठ राजकारण्यांनी शंका उपस्थित केल्यामुळे सर्व प्रकारची वाहने तपासण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुढील दिवसात पोलिसांची वाहने देखील तपासली जाणार असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
Share This Article