देश - विदेश
काँग्रेस ‘वाइड बॉल’, तर आपची स्थिती ‘नो बॉल’सारखी
ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकही सुरू आहे. अशा परस्थितीत देशातील राजकारण्यांनी क्रिकेटचा उल्लेख होणार नाही, हे शक्य नाही. क्रिकेटचा केवळ उल्लेखच नाही तर क्रिकेटच्या माध्यमातून राजकारण्यांकडून आरोप -प्रत्यारोप सुरु आहे. यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिमाचल प्रदेशातील बैजनाथ येथे जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसला ‘वाइड बॉल’ आणि ‘आप’ला ‘नो बॉल’ असे संबोधले.
सिंह म्हणाले की, सध्याच्या राजकारणाबाबत क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास, भाजप राजकारणाच्या खेळपट्टीवरील ‘गुड लेंथ बॉल’ बनला आहे, तर काँग्रेस ‘वाइड बॉल’ झाला आहे. तर आपची स्थिती ‘नो बॉल’ सारखी झाली आहे. काँग्रेस खूप प्रयत्न करत आहे पण त्यांचे काम होत नाही. आता काँग्रेस एक तेल संपलेले जहाज झाले आहे. आता कोणताही पायलट आला तरी काँग्रेसला धावपट्टीवरही धावता येणार नाही, उड्डाण तर दूरच, अशी जहरी टीकाही राजनाथ यांनी केली.