महाराष्ट्र
‘हे’ घटनाबाह्य कृषिमंत्री, काय नाव त्यांचं?; अब्दुल गद्दारच
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्या विधानानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून मुंबईतील सत्तारांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्यात आले. मुंबईनंतर त्याचे पडसाद ठाण्यातही उमटले.
दरम्यान, हे घटनाबाह्य कृषी मंत्री आहेत. काय नाव त्यांचं? काय नाव?, असा सवाल शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी करत सत्तार यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. ठाकरे हे अकोला दौऱ्यावर आहेत.
यावेळी ते दुष्काळाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सभा घेत सत्तारांच्या वादग्रस्त विधानाचा खरपूस समाचार घेतला. हे घटनाबाह्य कृषी मंत्री आहेत. काय नाव त्यांचं? काय नाव?…अब्दुल गद्दारच. त्या मंत्र्याने सुळेंसाठी वापरलेला शब्द घाणेरडा आहे, असं आदित्य म्हणाले.