खेळ

सेमी फायनलमध्ये भारत-इंग्लंड भिडणार

T20 विश्वचषकमधील सेमी फायनलचे ४ संघ निश्चित झाले आहेत. सेमी फायनल २ मध्ये भारताचा सामना १० नोव्हेंबर रोजी इंग्लंडशी होणार आहे. या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ संतुलित दिसत आहे. लोकेश राहुलपासून विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे धावा करत आहेत. भुवनेश्वर, अर्शदीप, मोहम्मद शमी हे तिघेही अप्रतिम कामगिरी करत आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला फिरकी गोलंदाज फार काही करू शकले नव्हते, पण झिम्बाब्वेविरुद्ध अश्विन आणि अक्षर यांनी मिळून ४ बळी घेतले.
इंग्लंडचा संघ स्फोटक फलंदाजांनी भरलेला आहे. पहिल्या क्रमांकापासून ते नवव्या क्रमांकापर्यंत या संघात असे खेळाडू आहेत जे मोठे फटके सहज खेळू शकतात आणि वेगाने धावा करण्यात पटाईत आहेत. 

या कारणामुळेच इंग्लंडचा संघ टी-20 मध्ये २०० च्या जवळपास धावा सहज करु शकतो. डेथ ओव्हर्समध्ये इंग्लंडची गोलंदाजी उत्कृष्ट आहे, पण पॉवरप्लेमध्ये हा संघ फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. पहिल्या सहा षटकांमध्ये इंग्लंडचे गोलंदाज जास्त धावा देत आहेत.

Related Articles

Back to top button