खेळ
सूर्या परग्रहावरून आला आहे
- टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमधील सामने 9 आणि 10 नोव्हेंबरला खेळवले जातील. पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. या मोठ्या सामन्याआधी पाकिस्तानच्या दिग्गजांना टीम इंडियाच्या खेळाडूची भीती वाटत आहे. या दिग्गजाचे म्हणणे आहे की, टीम इंडियाचा हा खेळाडू दुसऱ्या ग्रहावरून आला आहे.
टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने तुफानी खेळी केली होती. या दरमयान त्याने एक शॉट फुल टॉस डिलीव्हरीविरुद्ध फाइन लेगवर लावला होता. हा शॉट पाहून पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हैराण झाला. वकार युनिसने सूर्यकुमार हा दुसऱ्या ग्रहावरचा असल्याचे म्हटले.या वर्षात सूर्यकुमारने टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. सूर्यकुमार ICC टी 20 रँकिंगमध्ये नंबर वन फलंदाज आहे. 2022 मध्ये टी 20 क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. एका वर्षात 1000 धावा पूर्ण करणारा सूर्यकुमार पहिला भारतीय आहे. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने 25 बॉलमध्ये 61 धावा केल्यात यात त्याने 6 चौकार आणि 4 सिक्सर ठोकले.