राजकीय

ब्रेकिंग! पिक्चर अभी बाकी है, एक्झिट पोलवर विश्वास ठेवण्यात पॉईंट नाही कारण…

राज्यात विधानसभा मतदारसंघासाठी काल मतदान पार पडले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंदाजित आकडेवारीनुसार राज्यात 65.02 टक्के इतके मतदान झाले. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान काही टक्क्यांनी जास्त झाले आहे. त्यामुळे आता राज्यात कोणाची सत्ता येणार हे 23 तारखेला पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पण राज्यात निवडणूक पार पडताच अनेक संस्थांचे सर्व्हे अहवाल समोर आले असून यामध्ये भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष ठरणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या सर्वेक्षण अहवालावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले, हा संशोधनाचा विषय असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.

राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात येणाऱ्या आकडेवारीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये गुप्त मतदान करण्यात येत असते. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये लोक मनातली गोष्ट मांडतात, असे नाही. महाराष्ट्रातही यावेळी असेच झाले आहे.

त्यामुळे दोन, चार हजारांचा सर्व्हे करून कोण जिंकणार, कोण हरणार हे कसे सांगतात. हरयाणामध्येही काँग्रेस 60 जागा जिंकेल, असा एक्झिट पोल आलेला होता. लोकसभेला मोदी चारशे पार जातील, अशा प्रकारचा एक्झिट पोल तयार करून घेतलेला होता. त्याचे काय झाले हे लोकांनी पाहिले आहे, असा टोला राऊतांनी लगावला.

Related Articles

Back to top button