सोलापूर

सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठीच प्रणिती शिंदेने गद्दारी केली

  • दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटात राजकीय वातावरण तापले आहे. ऐन मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दक्षिण सोलापूरमधून ठाकरेंच्या शिवसेनेने अमर पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, महाविकास आघाडीचा धर्म न पाळता प्रणिती यांनी काडादी यांना ‘सपोर्ट’ केल्याने शिवसैनिकांनी त्यांच्या फोटोवर चपल्या मारत निषेध केला.
  • शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी प्रणिती यांचा एकेरी उल्लेख करत चांगलाच समाचार घेतला आहे. प्रणिती शिंदे गद्दार आहे. तिला लाज, लज्जा नाही. प्रणिती शिंदेची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करावी, अशी मागणी कोळी यांनी केली आहे.
  • कोळी म्हणाले, गद्दार प्रणिती शिंदेने सोलापुरातील शिवसैनिकांचा घात केला आहे. महाविकास आघाडीचा धर्म प्रणिती शिंदेने पाळला नाही. त्यामुळे गद्दार प्रणिती शिंदेची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करावी. गद्दार प्रणिती शिंदेची हकालपट्टीच नाहीतर काँग्रेसने खासदारकी रद्द करायला हवी. प्रणिती शिंदेला लाज, लज्जा असायला हवी होती. शिवसेनेच्या जिवावर ही खासदार झाली आहे.
  • उद्धव ठाकरे आजारी होते. मात्र, ठाकरे यांनी सभा घ्यावी म्हणून प्रणिती शिंदेने बूट चाटण्याचे काम केले. ठाकरे आजारी असताना प्रणिती शिंदेसाठी सभा घेतली. तिला याची जाण राहिली नाही. तिला मुळात अक्कल नाही. बेअक्कल आणि गद्दार माणसे आहेत.
  • प्रणिती शिंदेने भाजपकडून सुपारी घेतली आहे. खासदारकीच्या वेळी भाजपने प्रणिती शिंदेला मदत केली होती. त्यामुळे सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी शिंदेने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. आम्हाला काहीही फरक पडत नाही. आमचा उमेदवार निवडून येणार आहेच, असा विश्वास कोळी यांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button