ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा?
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. विविध संस्थांच्या या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही संस्थांनी राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आता हे अंदाज किती खरे ठरतात याचे उत्तर शनिवारी मिळणारच आहे. मात्र, या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला किती जागा मिळू शकतात याची माहिती घेऊ या.
पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाला 16 ते 35 जागा तर इलेक्टोरल एजनुसार ठाकरे गटाला 44 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
चाणक्य स्ट्रॅटेजी संस्थेच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे 35 उमेदवार निवडून येण्याची शक्यता दिसत आहे. लोकशाही रुद्र एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला किमान 20 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काही एक्झिट पोल्सने शिंदे गटापेक्षा ठाकरे गटाला जास्त जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.