सोलापूर
बिग ब्रेकिंग! सोलापूर जिल्ह्यात यंदा मतदानाची टक्केवारी वाढली
- सोलापूर, :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात आज मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी एकूण 65.41 टक्के मतदान झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
- जिल्ह्यात एकूण 38 लाख 48 हजार 869 मतदार असून आज सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत 25 लाख 17 हजार 374 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. यामध्ये पुरुष मतदार 13 लाख 17 हजार 364, स्त्री मतदार 11 लाख 99 हजार 912 तर तृतीयपंथी 98 मतदाराने मतदान केलेले आहे. मतदानाची एकूण सरासरी 65.41% झालेली आहे.
- विधानसभा निहाय झालेले एकूण मतदान व मतदानाची टक्केवारी खालील प्रमाणे…..
- 244 करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 23 हजार 207 मतदारांनी मतदान केले (67.85%).
- 245 माढा विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 48 हजार 167 मतदारांनी मतदान केले असून 70.36% टक्के मतदान झाले.
- 246 बार्शी विधानसभा मतदारसंघात 2 लाख 44 हजार 740 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची टक्केवारी 72.52%.
- 247 मोहोळ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघात 2 लाख 27 हजार 444 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 68.62% आहे.
- 248 सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 86 हजार 37 मतदारांनी मतदान केले असून 56.62 टक्के मतदान झालेले आहे.
- 249 सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण 1लाख 84 हजार 973 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची सरासरी 53.36% आहे.
- 250 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 46 हजार 699 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 64.33% आहे.
- 251 सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 33 हजार 342 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 58.35 टक्के आहे.
- 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 57 हजार 726 मतदारांनी मतदान केलेले आहे.
- मतदानाची टक्केवारी 68.97.
- 253 सांगोला विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 45 हजार 420 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 73.59% आहे.
- 254 माळशिरस अनुसूचित जाती मतदार संघात एकूण 2 लाख 29 हजार 619 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची सरासरी टक्केवारी 65.69% आहे.