देश - विदेश

भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले, पाच जवान शहीद

  1. देशात एक मोठी दुर्घटना झाली आहे. विमानतळावर उतरत असताना भारतीय हवाई दलाचे ‘अँटोनोव्ह एएन-32’ हे मालवाहू विमान कोसळले. विमानाला भीषण आग लागल्याची माहिती आहे. आसाममधील जोरहाट हवाई तळावर ‘एएन-32’ (AN-32) या मालवाहू विमानाला झालेल्या अपघातात भारतीय हवाई दलाच्या पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सह-वैमानिक बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
  2. आसाममधील जोरहाट येथील हवाई दल तळावर लँडिंग करताना लष्करी विमानाचा अपघात झाला. हे विमान ‘एएन-31’ (AN-31) प्रकारचे मालवाहू विमान होते, ज्याचा वापर साहित्याची ने-आण करण्यासाठी केला जातो. हवाई तळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य आणि तपास सुरू असून अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे, अशी माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे.

Related Articles

Back to top button