देश - विदेश

ब्रेकिंग! भारतीय वायू दलाचे ‘एएन-३२’ विमान कोसळले

शनिवारी (13 जून) भारतीय वायूसेनेचे एक AN-32 ट्रान्सपोर्ट विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. लँडिंग झाल्यानंतर लगेच विमानामध्ये अचानक आग लागल्याने सदर दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आसामजवळील जोरहाट एअरबेसमध्ये ही घटना घडली आहे. 

सुरुवातीच्या रिपोर्ट्सनुसार, विमानाने एअरबेसच्या रनवेवर सुरक्षित लँडिंग केले होते. पण त्यानंतर लगेच आगीचे लोट विमानातून येऊ लागले. आग लागल्याने एरअबेसमध्ये गदारोळ निर्माण झाला आणि वायूसैन्याकडून आपत्कालीन यूनिटला मदतीसाठी संपर्क साधण्यात आला.

दुर्घटनेची माहिती मिळताच, एअरबेसच्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने पोहोचल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासह विमानातील चार चालक दल आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन बचावकार्य सुरू करण्यात आले. वायूसैन्याच्या अधिकाऱ्यांकडून विमानातील लोकांची स्थिती आणि दुर्घटनेबद्दल अधिकृत कोणतेही विधान करण्यात आलेले नाही. हा अपघात झाल्यानंतर वायूसेनने एक विधान जारी करत म्हटले आहे की, “जोहराटमध्ये आज IAF च्या एका AN-32 विमानाचा अपघात झाला आहे. अधिक माहिती मिळाल्यावर पुढील अपडेट दिले जाईल.” अधिकाऱ्यांकडून विमानाला नक्की आग का लागली याबद्दल तपास केला जात आहे.

Related Articles

Back to top button