खुशखबर! श्री रामजन्मभूमीचे स्वस्तात होणार दर्शन
अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आली. देशभरात आनंदाचे वातावरण आहे, सर्वांच्या ओठांवर जय श्रीरामाचे नाव आहे. श्री रामजन्मभूमी मंदिराची स्थापना फक्त अयोध्येतच नाही तर देशातील इतर राज्ये आणि शहरांमध्ये साजरी केली जात आहे. दरम्यान तुम्हालाही अयोध्येतील श्री रामजन्मभूमीला भेट द्यायची असेल आणि यासाठी तुम्ही बजेट फ्रेंडची पर्यायाचा विचार करत असाल तर, आज आम्ही तुम्हाला IRCTC च्या स्वस्त टूर पॅकेजबद्दल सांगणार आहोत.
रेल्वेकडून एक परवडणारे टूर पॅकेज ऑफर केली जात आहे. ज्यामध्ये तुम्हाला अयोध्येतील श्री राम मंदिरसह तीन ज्योतिर्लिंगांचे दर्शन करता येईल. रेल्वेचे हे पॅकेज 9 रात्री 10 दिवसांसाठी आहे. यामध्ये तुम्हाला हॉटेल, जेवण, वाहतूक अशा सुविधा अत्यंत कमी दरात मिळणार आहेत.
रेल्वे अयोध्या आणि प्रयागराजसह तीन ज्योतिर्लिंग दर्शन टूर पॅकेज देत आहे. जे 9 रात्री आणि 10 दिवसांचे किफायतशीर पॅकेज आहे.
ही टूर पाच फेब्रुवारीपासून सुरू होईल. यामध्ये तुम्हाला ट्रेन, बस, हॉटेल, जेवण आणि विमा या सुविधा मिळतील. या पॅकेजची सुरुवातीची किंमत 20,500 रुपये आहे. पॅकेजच्या किंमती वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह बदलतात. अधिक माहितीसाठी तुम्ही भारतीय रेल्वेच्या (IRCTC) वेबसाइटला भेट देऊ शकता.