- सध्या महाराष्ट्रात मराठी- हिंदी वादाचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. मीरा भाईंदरमध्ये मराठीच्या वादावरुन एका गुजराती व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर हा वाद चांगलाच चिघळला. एकीकडे मनसेने मराठीवरुन आक्रमक भूमिका घेतली असतानाच याविरोधात मुंबईतील परप्रांतीयांनीही मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. अशातच या वादात आता 26/11 हल्ल्यामध्ये दहशतवादविरोधी कारवायांचे नेतृत्व करणाऱ्या माजी मरीन कमांडो प्रविण तेवतिया यांनी उडी घेतली आहे. तेवतिया यांनी ट्विट करत राज ठाकरेंना थेट सवाल केला आहे.
- तेवतिया यांनी ट्वीट करत राज यांच्यावर निशाणा साधला आहे. 26/11 च्या हल्ल्यात मी मुंबई वाचवली. मी यूपीचा आहे आणि मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले आहे. मी ताज हॉटेल वाचवले. त्यावेळी राज ठाकरेंचे हे तथाकथित योद्धे कुठे होते? देशाचे विभाजन करू नका. हास्याला भाषा नसते, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. या पोस्टसोबत त्यांनी वर्दीतील एक फोटोही पोस्ट केला आहे.
- मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान तेवतिया यांनी त्यांच्या पथकाचे नेतृत्व केले. या काळात त्यांच्या टीमने ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या मोहिमेवर होते. या कारवाईदरम्यान तेवतिया जखमी झाले होते, त्यांना चार गोळ्याही लागल्या होत्या. मात्र त्यांनी शौर्य दाखवत ताजमधील लोकांची सुटका केली होते. त्यांच्या धाडसीपणामुळेच ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या जवळपास 150 लोकांचे प्राण वाचले होते.
मैं यूपी का हूं, महाराष्ट्र के लिए खून बहाया! तब आपके योद्धा कहां थे?
