- टेस्ला आणि एक्सचे प्रमुख एलन मस्क यांनी अमेरिकेत एका नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. नवीन पक्षाच्या माध्यमातून ‘एक पक्षीय व्यवस्थेला’ आव्हान देणार असल्याचे मस्क यांनी स्पष्ट केले आहे. मस्क यांनी 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. सर्वाधिक निधीही दिला होता. ट्रम्प यांनी त्यांना त्यांच्या सरकारमध्ये समाविष्ट केले होते, परंतु बिग ब्युटीफुल बिलामुळे दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. बिग ब्युटीफुल विधेयकामुळे मस्क हे ट्रम्प यांच्या सरकारपासून स्वतः दूर झाले आहेत.
- मस्क यांनी असा दावा केला होता की, या विधेयकामुळे अमेरिकेचे कर्ज वाढेल. मस्क यांनी घोषणा केली होती की, जर हे विधेयक मंजूर झाले तर ते एक राजकीय पक्ष स्थापन करतील. दुसरीकडे, अमेरिकेत वन बिग ब्युटीफुल विधेयक मंजूर झाले आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही त्यावर अधिकृतपणे स्वाक्षरी केली. यानंतर त्यांच्या घोषणेनुसार मस्क यांनी आता त्यांचा नवीन राजकीय पक्ष स्थापन केला आहे, ज्याचे नाव अमेरिका पार्टी आहे.
- मस्क यांनी X वर पोस्ट केले की, जेव्हा देश दिवाळखोरीत निघतो तेव्हा आपण लोकशाहीत नाही तर एकपक्षीय व्यवस्थेत राहतो. आज, अमेरिका पार्टी तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य परत देण्यासाठी तयार केली गेली आहे.
- मस्क यांनी यापूर्वी एक सोशल मिडिया सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये त्यांनी लोकांना विचारले होते की, दोन शतकांपासून अमेरिकन राजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या व्यवस्थेपासून स्वातंत्र्य हवे का? या सर्वेक्षणाला १.२ दशलक्षाहून अधिक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
ब्रेकिंग! अमेरिकेत राजकीय भूकंप
