तिसरे महायुद्ध कधीही पेटू शकते

Admin
1 Min Read
  • जागतिक परिस्थितीवर भाष्य करत नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेला महायुद्धाचा इशारा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सुसंवाद, प्रेम आणि शांततेच्या अभावामुळे जग विनाशाच्या दिशेने वाटचाल करत असून कधीही तिसऱ्या महायुद्धाची शक्यता आहे, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.
  • काल‘बियॉन्ड बॉर्डर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात गडकरी बोलत होते. जगात महासत्तांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे सामाजिक समन्वय संपत चालला असून संघर्षाचे वातावरण अधिकच गडद होत आहे. भारताला या पार्श्वभूमीवर शांतीदूताची भूमिका पार पाडावी लागेल, असेही ते म्हणाले.
  • आजच्या युद्धाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी मानवी वस्त्यांवर हल्ले केले जात आहेत. यामुळे टँक, लढाऊ विमाने यांचे महत्त्व कमी झाले असून युद्ध अधिक प्रगत आणि विध्वंसक झाले आहे. अशा परिस्थितीत मानवतेचे रक्षण करणे अधिक अवघड बनले आहे.
  • आपण हळूहळू विनाशाच्या दिशेने जात आहोत. महासत्तांच्या निरंकुशतेमुळे संवाद संपतोय. जगभर यावर चर्चा व्हायला हवी आणि वेळेत पावले उचलली गेली पाहिजेत, असेही गडकरी म्हणाले.
Share This Article