XXX पैसे घे अन् चल निघ…

Admin
1 Min Read
  • सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे हिने मनसे नेते जावेद शेख यांच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत. मद्यपान करून गाडी चालवली अन् अपशब्दही वापरले, असा आरोप राजश्री मोरे हिने केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगात व्हायरल होत आहे, यावर अनेक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.
  • मुंबईतील अंधेरी परिसरामध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. राजश्रीच्या गाडीचा रविवारी रात्री अपघात झाला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 
  • या व्हिडिओत असणारी व्यक्ती स्वत:ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख असल्याचे सांगत आहे. तो मद्यपान करून गाडी चालवत होता. त्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप राजश्रीने केला आहे. व्हिडीओमध्ये राहिल अर्धनग्न अवस्थेमध्ये राजश्रीवर आक्रमकपणे शिवीगाळ करताना दिसून येत आहे. यामध्ये तो राजश्रीला धमकीही देत आहे. xxx पैसे घे. जा आणि पोलिसांना सांग, मी जावेद शेखचा मुलगा आहे. मग काय होईल ते तुला दिसेल, अशी धमकी त्याने राजश्रीला दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना देखील राहिलने दारुच्या नशेत दम भरला. त्यानंतर आंबोली पोलिसांनी धिंगाणा करणाऱ्या राहिलविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Share This Article