ब्रेकिंग! काही लोक म्हणत होते, भारतात राम मंदिर बनले तर आग लागेल
अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा सोहळा पार पडल्यानंतर मोदींनी भावना व्यक्त केल्या. यावेळी मोदींनी नामोल्लेख टाळत विरोधकांवर टीकेचे बाण डागले.
मोदी म्हणाले, तो पण एक काळ होता, जेव्हा काही लोक म्हणत होते की, राम मंदिर बनले तर आग लागेल. असे लोक भारताच्या सामाजिक भावनेच्या पवित्रतेला समजू शकले नाही. रामलल्लाच्या मंदिराचे निर्माण भारतीय समाजाच्या शांती, संयम, परस्पर सौहार्दता आणि समन्वयाचेही प्रतीक आहे, असे बोल मोदींनी विरोधकांना सुनावले.
मोदी पुढे म्हणाले की, मी त्या लोकांना (विरोधकांना) आवाहन करतो की, या, तुम्ही अनुभव घ्या. तुमच्या विचारांचा पुन्हा विचार करा. राम आग नाही. राम ऊर्जा आहे. राम विवाद नाही, राम समाधान आहे. राम फक्त आपले नाहीत, राम सगळ्यांचे आहेत. राम फक्त वर्तमान नाही, तर अनंतकाळ आहे.