बिजनेस

टाटा, महिंद्राची धाकधूक वाढणार!

  • देशात वाढत असणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सची मागणी पाहता आता देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीदेखील भारतीय बाजारात तीन नवीन इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याची जोरदार तयारी करत आहे. पुढील काही वर्षात कंपनी भारतीय कंपनीकडून नवीन इलेक्ट्रिक कार्स लाँच होण्याची शक्यता आहे.  कंपनी eVX, YMC MPV आणि eWX इलेक्ट्रिक कार्स बाजारात लाँच करण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.
    भारतीय बाजारात मारुती सुझुकी 2025 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार Maruti Suzuki eVX लाँच करू शकते. माहितीनुसार, 17 ते 22 जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये कंपनी ही कार लाँच करू शकते. ग्राहकांना या कारमध्ये हाय-माउंट स्टॉप लॅम्प, शार्क फिन अँटेना आणि स्लो अँटेना मिळेल. तसेच यात 17-इंच अलॉय व्हील्स मिळतील.
    Maruti Suzuki eVX कंपनी आपली पहिली MPV इलेक्ट्रिक कार Maruti Suzuki YMC MPV वर देखील कर असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय बाजारात ही कार 2026 च्या आसपास लाँच होऊ शकते. ही कार eVX मिडसाईज इलेक्ट्रिक SUV सारख्याच प्लॅटफॉर्मवर तयार होणार असून या कारमध्ये 60 kWh बॅटरी पॅक देण्यात येणार आहे ज्यामुळे ही कारदेखील तब्बल पाचशे किमीची रेंज देऊ शकते. त्यामुळे भारतीय बाजारात पुढील काही दिवसात Tata आणि Mahindra च्या इलेक्ट्रिक कार्सना स्पर्धा मिळणार आहे.

Related Articles

Back to top button