बिजनेस
ब्रेकिंग! ऐन दिवाळीत झटका
ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनादिवशीच एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार तर आहेच पण खिशाला कात्रीही लागणार आहे. आजपासून तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या ताज्या दरानुसार आता हे गॅस सिलेंडर 62 रुपयांनी महाग झाला आहे.
मात्र, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडर 1754.50 रुपयांना मिळणार आहे. तर चेन्नईमध्ये 1964.50 रुपये किंमत आहे. मागच्या काही महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती सातत्याने वाढत आहेत.