राजकीय
तो राक्षस, मी 26 वर्ष त्याला स्वत:चे रक्त पाजले

- सध्या राज्यातील विविध भागात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग आला आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
- त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीतील रंगत आणखी वाढणार आहे. दरम्यान परळी विधानसभा मतदारसंघातून करुणा शर्मा यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु, त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. त्यामुळे शर्मा या चांगल्याच संतापल्या आहेत. शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शर्मा यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर टीका केली आहे.
- महाराष्ट्रात लोकशाही संपलेली आहे. मी परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. तसेच परळीत सुरु असलेल्या गुंडगिरी, अन्याय आणि अत्याचाराविरोधात मी आवाज उठवलेला होता. मला कोणाचा सपोर्ट नसताना आणि माझा मोठा पक्ष नसताना मी लढत होते. मला जनतेवर विश्वास आहे. त्यामुळेच मी परळीमधून अर्ज भरला होता. तो राक्षस आहे. मी 26 वर्ष त्याला स्वत:चे रक्त पाजले. एक महिला स्वत:चे अस्तित्व गमावून, पतीचे अस्तित्व बनवत असते. तू माझा उमेदवारी अर्ज अवैध ठरवलेला नाही, तर तू स्वत:ची हार लिहून ठेवलेली आहे. तू एका महिलेला भीत आहेस. याचा इतिहास साक्षी आहे, अशी खदखद शर्मा यांनी सोशल मिडीयावर बोलून दाखवली आहे.



