क्राईम
फार्म हाऊसवर भलताच उद्योग
- राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिस सज्ज आहेत. अशातच कोल्हापूर येथे गस्तीवर असतांना एका फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी काही तरुणींना नाचवून दारू पिऊन काहीजण धिंगाणा घालत असल्याचे पोलिसांना आढळले. या प्रकरणी ९ डान्सर तरुणींसह ३१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात व जिल्ह्यात पोलिस गस्त घालत आहे. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची चोख तपासणी केली जात आहे. अशातच गगनबावडा परिसरातील कोदे येथे एका फार्म हाऊसवर बेकायदेशीर पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार यांच्या पथकाने या ठिकाणी छापेमारी केली.
- याठिकाणी काहीजण अश्लील हावभाव करून दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी या ठिकाणावरून ९ डान्सर तरुणींसह ३१ जणांना ताब्यात घेतले आहे. यात मुंबई, नवी मुंबई, पुणे सांगलीसह कोल्हापुरातील काही जणांचा समावेश आहे. या कारवाईत चार लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमालदेखील पोलिसांनी जप्त केला आहे. यात दारू, मोबाईल व इतर काही गोष्टींचा समावेश आहे.