बिजनेस

ब्रेकिंग! ऐन दिवाळीत खाद्यतेलाच्या दरात वाढ

  • खाद्य तेलाच्या किमतींमध्ये ऐन दिवाळीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत देखील वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. दिवाळी म्हटले की, दिवाळीसाठी लागणारे फराळ बनविण्यासाठी सर्वात जास्त तेलाचा वापर केला जातो. मात्र याच दरम्यान आता खाद्यतेलाच्या दरात वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
  • खाद्य तेलाचे भाव वाढल्याने स्वयंपाक घरातील फोडणी देखील महागली आहे. तेलाचे भाव एका किलो मागे तब्बल 25 ते 30 रुपयांनी वाढले आहेत. केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करावर 20 रुपयांनी वाढ केली आहे.
  • तसेच दोन टक्के सेल्स असे 22 टक्के वाढ करण्यात आली आहे. याचाच फटका खाद्यतेलाच्या दरावर झाला आहे. मात्र, याचा सामना सर्वसामान्य ग्राहकांना करावा लागत आहे. कच्चे सोयाबीन, पाम तेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात 20 टक्के वाढ, तर रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क 35.75 टक्के वाढवले आहे.
  • ग्राहक खरेदी करत असलेल्या राइस ब्रान आणि सोयाबीन तेलाचा किरकोळ दर आतापर्यंत 110 रुपये प्रति लीटर होता. तो दर आता 125 रुपयांच्या घरात गेला आहे. तर 125 रुपयांचे सूर्यफूल तेल 140 ते 145 रुपये तर 160 ते 170 रुपयांचे शेंगदाणा तेल 190 रुपयांपर्यंत पोहचल्याचे निदर्शनास येत आहे.
  • सूर्यफूल तेलाच्या 15 किलो डब्याचा जुना दर 1750 रुपये होता तर आताचे दर 2140 रुपये आहे. तसेच सोयाबीन डब्याचा जुना दर 1600 रुपये व आताचे दर 2050 रुपये आहे. पामतेल जुना दर 1600 तर आताचे 1850 रुपये दर आहेत.

Related Articles

Back to top button