बिजनेस

गॅस सिलेंडर, रेल्वे तिकीट अ‍ॅडव्हान्स बुकिंग ते क्रेडिट कार्ड…

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणाऱ्या गोष्टींबाबत काही नियम बदल होत असतात. आज ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा तर उद्या नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या तारखेपासूनच अनेक महत्त्वाच्या नियमांत बदल होणार आहेत.

उद्यापासून अ‍ॅडव्हान्स तिकीट बुकिंगच्या नियमात काही बदल होण्याची शक्यता आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा कालावधी आता 120 ऐवजी 60 दिवस होऊ शकतो. येत्या एक नोव्हेंबरपासून कोणत्याही प्रवासासाठी 60 दिवसाच्या अगोदर तिकीट आरक्षित करता येणार आहे.

रिझर्व्ह बँकेने डोमॅस्टिक मनी ट्रान्सफरच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून हा नवा नियम लागू होईल. फसवणुकीपासून ग्राहकांचे रक्षण व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या दरात बदल करत असतात. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरचा नवा दर लागू होण्याची शक्यता आहे. आता याचे दर वाढणार की घसरणार, त्याकडे सर्वसामान्यांचे लक्ष राहील.

एसबीआय क्रेडिट कार्ड युजर्ससाठी उद्यापासून नवे नियम लागू होणार आहेत. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 50 हजारांपेक्षा कमी युटिलिटी बिल असेल, तर तुम्हाला कोणताही अतिरिक्त चार्ज लागणार नाही.

Related Articles

Back to top button