ब्रेकिंग! सोलापुरात अजितदादांना दणका
सध्या राज्यातील विविध भागात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग आला आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीतील रंगत आणखी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात एक नाट्यमय राजकीय घडामोड घडली आहे. ऐन निवडणुकीत अजितदादा पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
अजितदादा गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यातील गोविंद बाग येथे भूमकरांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भूमकर यांच्यासह १५ नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. भूमकर हे वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. वैराग नगरपंचायतीवर भूमकर यांची एक हाती सत्ता आहे.