बिजनेस
दिवाळीचा आनंद होणार द्विगुणित!
- भारतातील विश्वसनीय हिरो कंपनीने एक नवी इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. त्याचे नाव आहे Hero Optima CX 5.0. Optima CX 5.0 अतिशय मजबूत आणि उत्कृष्ट फीचर्ससह सज्ज आहे. उदाहरणार्थ, या बाईकमध्ये तुम्हाला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्पीडोमीटर, ओडोमीटर, ट्रिप मीटर यांसारखी सर्व महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.
- 4.38 इंच एलईडी स्क्रीनसह ही बाईक उपलब्ध आहे. ज्यामध्ये बाईकची स्पीड मायलेज असे सगळे फीचर्स दिसू शकतात. शिवाय या बाईकमध्ये तुम्हाला तुमचा फोन चार्ज करण्यासाठी चार्जिंग पोर्टसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या बाईकचे वजन 99 किलोग्रॅम इतके आहे.
- ३.३ किलोमीटरची बॅटरी या बाईकमध्ये तुम्हाला मिळेल. एकदा सिंगल चार्ज केल्यानंतर ही बाईक 129 किलोमीटरपर्यंत चालवली जाऊ शकते आणि शंभर टक्के चार्ज होण्यासाठी ही गाडी जवळपास दोन तास 45 मिनिटांचा वेळ घेते. एक लाख चार हजारांच्या आसपास या बाईकची किंमत आहे.