बिजनेस

ब्रेकिंग! ग्राहकांना मोठा दिलासा!

देशात सणासुदीच्या काळात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. सध्या गणेशोत्सवाचा सण थाटात पार पडला. यावेळी सोन्याचे भाव गगनाला भिडले होते मात्र, या आठवड्याच्या सुरूवातीपासून ग्राहकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. दोन दिवस थोडं का होईना सोन्याच्या किंमती घसरलेल्या पाहायला मिळत आहेत.
काल 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 74, 890 रूपये होता. आज यामध्ये 160 रूपयांनी घट झाली असून 74, 730 रूपये किंमत झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 150 रूपयांनी घसरला असून 68,500 रूपये किंमत झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत हजार रूपयांनी घटली असून 91,000 रूपये किंमत झाली. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. आता लग्नासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते सणासुदीच्या काळात सोन्याचा दर 76,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो.

Related Articles

Back to top button