मनोरंजन
ब्रेकिंग! एआय आधारित करिना कपूरचा व्हिडिओ तुफान व्हायरल

- पाकिस्तानमधील एका रेव्ह पार्टीत करिना कपूरचा एआय आधारित अॅनिमेटेड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये करिनाच्या डिजिटल रूपाला पार्टीतील म्युझिक बीट्सवर डान्स करताना दाखवण्यात आले आहे. मात्र, चाहत्यांच्या प्रतिक्रिया मात्र या व्हिडिओवर नकारात्मक दिसत आहेत.
- पाकिस्तानी डीजे हमझा हारिस याने या व्हिडिओची निर्मिती केली असून तो स्वतःच्या इंस्टाग्राम हँडलवरून व्हायरल केला. त्याने सांगितले की, या ट्रॅकवर मी खूप काळापासून काम करत होतो. शोसाठी ते वेळेत पूर्ण केले आणि मग वाटले की, काहीतरी दृश्यात्मक हवे. ट्रॅक तयार करताना मी ‘कभी खुशी कभी गम’ पाहत होतो आणि ‘पूह’चा प्रसिद्ध संवाद मला आठवला. म्हणून विचार केला का नाही करिनाला नाचताना दाखवायचे?