हवामान
ब्रेकिंग! राज्यात उष्माघाताचा पहिला बळी

- राज्यात तापमानात झपाट्याने वाढ होत असून उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. या वाढत्या उष्णतेचा गंभीर परिणाम आता शाळकरी मुलांवर होऊ लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यात इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. विद्यार्थी शाळेमधून घरी येत होता. अचानक त्याची तब्येत बिघडली. प्राथमिक उपचार करून त्याला अकोला नेण्यात येत होते, मात्र रस्त्यावरच त्याची प्राणज्योत मालवली. संस्कार सोनटक्के असे विद्यार्थ्याचे नाव आहे. हा चिमुकला शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठ विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत होता. बऱ्याच दिवसांपासून उष्मघाताच्या त्रासामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. संस्कार शाळेतून घरी परतला होता. घरी परतल्यानंतर त्याची अचानक तब्येत बिघडली.
- प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे नेत असतानाच, रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. उष्माघाताचा बुलढाण्यात पहिला बळी गेला असून यामुळे शाळा प्रशासनाने तसेच पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.