क्राईम

…तर मुलींनी बापाचा खून करावा

  • बाप जर मुलींवर अत्याचार करत असेल, तर मुलींनी अशा बापाचा खूनच करावा, असे खळबळजनक वक्तव्य अभिनेत्री अलका कुबल यांनी केले आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपल्या देशातही आखाती देशांप्रमाणे कठोर कायदे असायला हवेत, असे आवाहनही कुबल यांनी केले. दरम्यान, जळगावमध्ये झालेल्या खान्देश करिअर महोत्सवाच्या निमित्ताने कुबल जळगावमध्ये उपस्थित होत्या. त्यावेळी अनेक सामाजिक आणि कौटुंबिक विषयांना स्पर्श करणारी मुलाखत त्यांनी माध्यमांना दिली.  
  • महिलांवर अत्याचार रोखायचे असतील तर आखाती देशांप्रमाणे कठोर कायदे असायला हवे, त्यात एखादा बापच जर मुलीवर अत्याचार करत असेल तर मुलींनी अशा बापाचा खूनच करायला हवा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अलका कुबल यांनी दिली. लहान वयातच मोबाईलच्या अतिरेकामुळे मूलभूत संस्कार हरवत चालले आहेत. घरात मोठ्यांचे मार्गदर्शन आणि एकत्रित कुटुंबपद्धतीमुळे चांगले संस्कार रुजतात, असा आपला अनुभव असल्याचे अलका कुबल यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button